Expansion of Idea (कल्पना विस्तार )
एक्सपान्शन ऑफ आयडिया म्हणजे एखादी म्हण किंवा सुविचार यांचा शब्द विस्तार करणे. तसेच त्याच्यावर एखादा सुसंबंधीत सुसंघटित पॅरेग्राफ लिहिणे. त्यासाठी तुम्हाला त्या म्हणीचा किंवा सुविचाराचा अर्थबोध होणे गरजेचे आहे म्हणजे त्याचा सखोल अर्थ तुम्हाला माहीत असणे अपेक्षित आहे.
या पॅरेग्राफ मध्ये एक विषय वाक्य Topic Sentence असतो जो तो त्या पॅरेग्राफ ची मुख्य आशय स्पष्ट करतो .कोणताही पॅरेग्राफ विषय वाक्य विना पूर्ण असू शकत नाही. म्हणजे पॅरेग्राफ मधून आपण टॉपिक सेन्टेन्स कधीच काढू शकत नाही.
शक्यतो एक्सपान्शन ऑफ आयडिया मध्ये तीन पॅरेग्राफ असावे.
Introduction इंट्रोडक्शन:
एक आदर्श पॅरेग्राफ हा विषय वाक्यशी (Topic Sentence) संबंधित असतो.
विषय वाक्य पॅरेग्राफच्या सुरुवातीला मध्ये किंवा शेवटी येऊ शकतो.
म्हणीचा अक्षरशः (Literal)अर्थ किंवा प्रतीके(Symbolism) किंवा रूपके (metaphor) यांचा अर्थ समजून योग्य पद्धतीने सांगावा. थोडक्यात दिलेल्या म्हणीचा योग्य ते मूल्यांकन करणे गरजेचे आहे.
Core Content मध्यभाग:
मध्यभागी मूळ लिखाण करण्यासाठी प्रथम काय सांगितलं आहे हे समजून घेणे. उदाहरण देणे, छोटीशी घटना सांगणे, अनुभव सांगणे किंवा स्वअनुभव सांगणे या गोष्टी करू शकतो.
विचारांची एकीकरण आणि स्पष्टता असणे गरजेचे आहे. तसेच वाक्या वाक्यामध्ये सुसंगती असणे महत्त्वाच आहे. त्यासाठी Discourse Markers,conjunction or conjuctive phrases चा वापर करू शकता .
कोणत्या मजकुराला अधिक महत्त्व (Proportion of Emphasis )आणि जागा (Proportion of Space) आपल्या लिखाणात द्यायची याबाबतीत अगोदरच ठरवलं गेलं पाहिजे.
Conclusion
आणि शेवट करताना योग्य आणि तितकेच मजबूत दावे देऊन मुद्दे लिहून सारांश पद्धतीने विचार मांडणे गरजेचे आहे. एका दिलेल्या म्हणीसाठी त्याच अर्थाची दुसरी म्हण देवुन शेवट करता आला पाहिजे..Discourse markers :म्हणजे संप्रेषण , वर्णन आणि विचारांची देव घेव ,
जे शब्द जोडतात, चिन्हांकित करतात, संवादाला दिशा देतात ते Discourse Markers आहेत.Discourse Markers कथा किंवा संभाषण जोडतात.

0 Comments